शिर्डी साई बाबा काकड आरती
1. जोडूनियां कर
जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥ 1 ॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।
कृपादृष्टीं पाहें मजकडे सद्गुरुराया ॥ 2 ॥
अखंडित असावें ऐसे वाटतें पायीं ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देयी ॥ 3 ॥
तुकाम्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।
नामें भवपाश हातीं आपुल्या तोडी ॥ 4 ॥
2. उठा पांडुरंगा
उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ 1 ॥
गरूडपारापासुनी महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची मांदी उभी जोडूनिया हात ॥ 2 ॥
शुकसनकादिक नारदतुंबुर भक्तांच्या कोटी ।
त्रिशूल डमरू घेउनि उभा गिरिजेचा पती ॥ 3 ॥
कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।
पाठीमागें उभी डोला लावुनियां जनी ॥ 4 ॥
3. उठा उठा श्री सायिनाथ गुरु
उठा उठा श्रीसायिनाथ गुरु चरणकमल दावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया
परि ही अज्ञानासी तुमची भुलवि योगमाया ।
शक्ति न अम्हां यत्किंचितही तिजला साराया
तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ॥ 1 ॥
भो सायिनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी
अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ॥ 2 ॥
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ।
उठा उठा श्रीसायिनाथ गुरु चरण कमलदावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥
भक्त मनीं सद्भाव धरूनि जे तुम्हां अनुसरले
ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्वारिं उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धाले
परि त्वद्वचनामृत प्राशायातें आतुर झाले ॥ 3 ॥
उघडूनी नेत्रकमाला दीनबंधु रमाकांता ।
पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप सायिनाथ ॥ 4 ॥
आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितो देवा ।
सहन करीशी एकुनी द्यावी भेट कृष्ण धावां ॥ 5 ॥
उठा उठा श्री सायिनाथ गुरु चरणकमल दावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥ 6 ॥
4. दर्शन द्या
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ 1 ॥
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा शेजे सुखे आतां बघुं द्या मुखकमळा ॥ 2 ॥
रंगमंडपी महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ॥ 3 ॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया ।
शेजे हालवूनी जागें करा देवराया ॥ 4 ॥
गरूड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गींचे सुरवर घेउनि आले बोभाट ॥ 5 ॥
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेउनि कांकडा ॥ 6 ॥
5. पंचारती
घेउनियां पंचारती ।
करूं बाबांसी आरती ॥ 1 ॥
उठा उठा हो बांधव ।
ओंवाळूं हा रमाधवा ॥ 2 ॥
करूनिया स्थिर मन ।
पाहूं गंभीर हें ध्यान ॥ 3 ॥
कृष्णनाथा दत्तसायी ।
जडो चित्त तुझे पायी ॥ 4 ॥
6. चिन्मयरूप
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।
वैराग्याचे तूप घालुनि मी तो भिजविला ।
सायीनाथ गुरुभक्ति ज्वलनें तो मी पेटविला ।
तद्वृत्ती जाळूनी गुरुनें प्रकाश पाडीला ।
द्वैततमा नासूनी मिळवी तत्स्वरूपीं जीवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥ 1 ॥
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
भूखेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहसी ।
तोचि दत्तदेव शिरडी राहुनी पावसी ।
राहूनी येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धावसी ।
निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥ 2 ॥
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
त्वद्यशदुंदुभीने सारे अंबर हें कोंदलें ।
सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनी त्वद्वचनामृत अमुचे देहभान हरपलें ।
सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करूनियां सायिमाउले दास पदरी घ्यावा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥ 3 ॥
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
7. पंडरीनाथा
भक्तिचिया पोटीं बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावे ओवाळूं आरती ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । (माझ्या सायीनाथा)
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥ 1 ॥
काय महिमा वर्णू आतां सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ 2 ॥
रायी रखुमाबायी उभ्या दोघी दो बाहीं ।
मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायीं ठायी ॥ 3 ॥
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । (माझ्या सायीनाथा)
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥ 4 ॥
8. उठा उठा (पद)
उठा साधुसंत साधा आपुलालें हित ।
जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ॥ 1 ॥
उठोनियां पहाटें बाबा उभा असे विटे ।
चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका ॥ 2 ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाउंया राउळासी ।
जळतील पातकांच्या राशी कांकड आरती देखिलिया ॥ 3 ॥
जागें करा रुक्मिणीवर देव आहे निजसुरांत ।
वेगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ॥ 4 ॥
दारीं वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती ।
होतसें कांकड आरती माझ्या सद्गुरु रायांची ॥ 5 ॥
सिंहनाद शंखभेरी आनंद होतसें महाद्वारी ।
केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ॥ 6 ॥
भजन
सायिनाथ गुरु माझे आई ।
मजला ठाव द्यावा पायीं ॥
दत्तराज गुरु माझे आई ।
मजला ठाव द्यावा पायीं ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ महाराज की जै ।
9. श्री सायिनाथ प्रभाताष्टक
(पृथ्वी)
प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा पांकली
स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।
म्हणोनि कर जोडूनी करूं आता गुरुप्रार्थना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 1 ॥
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता
परंतु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 2 ॥
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा
तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।
हरोनी अभिमानही जडवि त्वत्पदीं भावना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 3 ॥
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी
कुठोनि मग येई ती कवनीं या उगी पाहुणी ।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 4 ॥
समाधि उतरोनियां गुरु चला मशिदीकडे
त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।
अजातरिपु सद्गुरु अखिलपातका भंजना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 5 ॥
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले
विलोकुनि पदाश्रिता त्वदिय आपदे नासिलें ।
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 6 ॥
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुचि कृपा
न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।
जरी गुरुपदा धरी सुधृड भक्तिनें तो मना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 7 ॥
गुरो विनंति मी करीं हृदयमंदिरीं या बसा
समस्त जग हें गुरुस्वरूपची ठसो मानसा ।
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ 8 ॥
(स्रग्धारा)
प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं
त्यांचे चित्तासि देतों अखिल हरूनियां भ्रांति मी नित्य शांति ।
ऐसें हें सायिनाथें कथुनि सुचविलें जेवि या बालकासी
तेंवी त्या कृष्णपायी नमुनि सविनयें अर्पितों अष्टकासी ॥ 9 ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ महाराज की जै ।
10. सायि रहम् नजर् करना
सायि रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायि रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥
जाना तुमने जगत्पसारा सब् हि झूठ् जमाना ।
जाना तुमने जगत्पसारा सब् हि झूठ् जमाना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥ 1 ॥
मैं अंधा हूं बंदा आप् का मुझ् को चरण दिखलाना ।
मैं अंधा हूं बंदा आप् का मुझ् को प्रभु दिखलाना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥ 2 ॥
दास गनू कहे अब् क्या बोलूं थक् गयि मेरी रसना ।
दास गनू कहे अब् क्या बोलूं थक् गयि मेरी रसना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥ 3 ॥
11. रहम् नजर् करो
रहम् नजर् करो अब् मोरे सायीं
तुम बिन नहीं मुझे मां बाप् भायी ॥
रहम् नजर् करो ॥
मैं अंधा हूं बंदा तुम्हारा ।
मैं अंधा हूं बंदा तुम्हारा ।
मैं ना जानूं मै ना जानूं
मैं ना जानुं अल्ला इलाही ॥ 1
रहम् नजर् करो ॥
खाली जमाना मैंने गमाया ।
खाली जमाना मैंने गमाया ।
साथी आखिरी (का) साथी आखिरी (का)
साथी आखिरी तू और् न कोयी ॥ 2
रहम् नजर् करो ॥
अप्ने मसीद् का झाडू गनू है ।
अप्ने मसीद् का झाडू गनू है ।
मालिक् हमारे मालिक् हमारे
मालिक् हमारे तुम् बाबा सायी ॥ 3
रहम् नजर् करो ॥
12. जनि पद
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी ॥
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी ।
तूं जगन्नाथ तुज देऊं कशी रे भाकरी ॥
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता । श्रीकांता ।
मध्याह्नरात्र उलटोनि गेली हि आतां । आण चित्ता ॥
जा होईल तुझा रे कांकडा कीं राउळांतरीं ।
आणतील भक्त नैवेद्यहि नानापरी ॥
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी ॥
13. श्रीसद्गुरु पद
श्रीसद्गुरु बाबा सायी
तुजवांचुनि आश्रय नाहीं भूतली ॥
मी पापी पतित धीमंदा ।
तारणें मला गुरुनाथा झढकरी ॥ 1 ॥
तूं शांतिक्षमेचा मेरू ।
तूं भवार्णवींचें तारूं गुरुवरा ॥ 2 ॥
गुरुवरा मजसि पामरा,
अतां उद्धरा,
त्वरित लवलाही,
मी बुडतो भवभय डोही उद्धरा ॥ 3
श्रीसद्गुरु बाबा सायी
तुजवांचुनि आश्रय नाहीं भूतली ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ महाराज की जै ।
राजाधिराज योगिराज परब्रह्म सायिनाथ महराज् की जै ।